ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालकासह समितिने मोर्चा वळविला प स शिक्षण विभागावर

केशरवाही जि. प. शाळेची व्यथा ; १ ते ४ वर्ग ,१८ पटसंख्या ,२ शिक्षकी शाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

अर्धे शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असताना केवळ एकाच शिक्षकाच्या भरोशावर १ ते ४ अशा १८ विद्यार्थ्याना ज्ञानर्जन करण्याची वेळ निर्माण झाली आहे, परिणामी चालू सत्रात शिक्षणाचा खेळखंडोबा होत असताना शिक्षकाच्या मृत्यु मुळे खाली असलेली जागा त्वरित भरण्यात यावी यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन तो नुकताच विद्यार्थी पालकासह शिक्षणाधिकारी प स सावली यांचेकडे सादर करुण नव्या शिक्षकाची त्वरित भर्ती करन्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

ठराव देताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिम्मतलाल आभारे,उपाध्यक्ष सोनी भोपये ,सदस्य वामन भोपये ,किशोर मेश्राम,अमित भोपये , प्रमोद भोपये , उषा घेर ,सुवर्णा भोपये,किरण हेटकर ,पौर्णिमा मानकर , दीपाली चौधरी, पालक करिश सोनुले ,शरद तिवाडे ,ईश्वर चौधरी, सुधीर शेंडे ,श्रीराम शेंडे ,जगदीश गावतूरे ,उपस्थित होते.

सविस्तर असे की सावली येथून जवळच असलेल्या केंद्र बोथली आणि बिट पाथरी अंतर्गत येत असलेल्या केशरवाही जि. प .येथे दोन शिक्षकी शाळा असून १ ते ४ वर्ग आहेत, पैकी वर्ग १ ली विद्यार्थी २ , वर्ग २ रा ६ , वर्ग ३ रा ६ , वर्ग ४ था ४ असे १८ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत,,या दोन शिक्षिकी शाळेत , एका शिक्षकाचा मृत्यु झाल्याने सर्व शाळेची जबाबदारी एकाच शिक्षकावर येऊन पडल्याने चालू शैक्षणिक सत्राचा खेळखंडोबा निर्माण होत असताना केशरवाही जि प शाळेच्या शिक्षणाची समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांचे चालू सत्र वाया जाऊ नये या हेतुनी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या मदतीने ठराव घेऊन नुकताच प स शिक्षणाधिकारी यांचे कडे सादर करुण नव्या शिक्षकाची त्वरित भर्ती करण्यात यावी अशी मागणी केली.

केशरवाही जि प शाळे तील शिक्षकाच्या मृत्यु मुळे रिक्त असलेली जागा भरण्या साठी वरिष्ठा कडे पाठपुरावा केल्या असल्याचे यावेळी गटशिक्षणाधिकारी यांचेकड़ू समिति आणि पालकाना सांगण्यात आले दरम्यांन विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षनिक वर्ष वाया जाऊ नये शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये नव्या शिक्षकाची भर्ती करण्यात यावी यासाठी विद्यार्थ्या सह पालक आणि शाळा व्यवस्थापन समिति ठरावा सह प स शिक्षनाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता सद्या स्थितीत १ ते ४ वर्गासाठी एकच शिक्षक कार्यरत आहे हे विशेष.

केशरवाही जि प शाळेची पटसंख्या १८ असुन एक शिक्षक कार्यरत आहे दुस ऱ्या शिक्षकाच्या मृत्यु मुळे एक जागा रिक्त असल्याने रिक्त जागा त्वरीत भरन्यासाठी वरिष्ठाकडे पाठपुरावा केला आहे
एल.जे.खंडारे
गटशिक्षणाधिकारी प स
शिक्षण विभाग सावली.

केशरवाही जि प शाळा दोन शिक्षकी असुन एका शिक्षकाचा मृत्यु झाला त्यामुळे सर्व जबाबदारी एकाच शिक्षकावर आहे परिणामी नवे अर्धे शैक्षनी क वर्ष समाप्त होत असल्याने विद्यार्थ्याच्या शैक्षनिक वर्षोंचा खेळ खंडोबा होत आहे हि समश्या लक्षात घेता नव्या शिक्षकाची भर्ती करन्यात यावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिति विद्यार्थी सह पालक यानी शिक्षणाधिकारी याचेशी चर्च्या करुण नव्या शिक्षकाची भर्ती करन्यात यावी असा ठराव देण्यात आला.
हिम्मतलाल आभारे
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति केशरवाही केंद्र बोथली बिट पाथरी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये