Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालक व पालकांनी गुरूच्या आदेशाचे पालन करावे : उत्क्रांती विजेंद्र वानखेडे

लिटिल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेन्ट येथे पालक शिक्षक संमेलनाचे आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        तालुक्यातील पाटाळा येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेन्ट मध्ये शनिवार दिनांक ० १७ ऑगस्ट २०२४  रोजी कॉन्व्हेन्ट मध्ये पालक सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष म्हणून कॉन्व्हेन्टच्या प्राचार्य सौ उत्क्रांती विजेंद्र वानखेडे, प्रमुख अतिथी भाग्यश्री पोटे व कार्यक्रमाचे समन्वयक राजेश रेवते तर पालक प्रतिनिधी म्हणून अजाबराव आगलावे, व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्या सौ उत्क्रांती विजेंद्र वानखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता कॉन्व्हेन्ट मध्ये विविध उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन केले.

प्रमुख अतिथी म्हणून समन्वयक राजेश रेवते यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हाने किंवा समस्या राहतील त्यांना समर्थपणे त्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असे स्पष्ट केले.

पालक प्रतीनिधी म्हणून अजाबराव आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये