ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२५ वी सिनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याची सुवर्ण कामगिरी

चांदा ब्लास्ट

विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, नागपूर (वि.टी.बी.सी.ए.) अंतर्गत २५ वी सिनीयर व २० वी ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच एन.एम.सी. स्पोर्ट्स ग्राउंड, रामनगर, नागपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधून सुमारे ४०० पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या २५व्या सिनीयर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत दि. चंद्रपूर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चंद्रपूरच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाचे नेतृत्व सुरज परसूटकर यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तसेच सिनीयर मुलींच्या संघानेही कु. रुचिता आंबेकर हिने संघाचे प्रभावी नेतृत्व करत हिच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे ज्युनियर मुलींच्या गटात चंद्रपूर जिल्ह्याच्या संघानेही चांगली कामगिरी बजावत तृतीय क्रमांक पटकावला.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.सदर खेळाडूंना प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून चंद्रपुर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुरचे सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले. प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या प्रशिक्षणात व वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे आज पर्यंत अनेक खेळाडुंना यश व प्राविण्य प्राप्त झाले.

    सदर स्पर्धेतील यशाबद्दल विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मा. अजय हिवरकर, सचिव मा. राजकुमार कैथवास तसेच दि. चंद्रपुर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपुरचे अध्यक्ष मा. डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष मा. डॉ. विशाल शिंदे, श्री. पुरुषोत्तम आगलावे, सचिव प्रा.विक्की तुळशीराम पेटकर, सहसचिव श्री. सूरज परसुटकर, संस्थेचे सल्लागार मा. डॉ. महेशचंद शर्मा, कोषाध्यक्ष कु. रुचिता आंबेकर, सहकोषाध्यक्ष कु. श्रुती घटे, सदस्य वर्षा घटे, हर्षल क्षिरसागर, बंडू डोहे, इखलाक पठान, चंद्रकांत परसूटकर तसेच डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ.निखिल देशमुख, डॉ. सुनील चिकटे यांनी सुध्दा खेळाडूंचे कौतुक करून अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये