ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरचा सीबीएसई इयत्ता 10 वी मध्ये शंभर टक्के निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूर यांनी सीबीएसई इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल लावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु. श्रेय्या बत्तुलवार हिने 97.8% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. इशिता बेले हिने 96.2% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु. पल्लवी उईके हिने 96% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. सी.आर.के. मोहन तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.



