ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एम एस कॉटन सोर्नुली आणि श्रीनिवास फायबर जिनिंग मध्ये भव्य कापुस शुभारंभ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 आज कोरपना तालुक्यातील २ जिनिंग मध्ये कापुस खरेदी शुभारंभ करण्यात आला. पारडी येथील शेतकरी श्री एकनाथ भाऊ यांनी कापुस गाडी आणुन श्री डॉ प्रकाश खनके शिवम् कॉटन कमिशन कं. मालक यांच्या दलालीत दिली त्यावेळी जिनिंगचे ग्रेडर श्री जितुभाऊ हजर होते.

शेतकरी श्री एकनाथ भाऊ यांचा शाल, श्रीफळ व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. व कापसाला ७००० रुपये भाव देण्यात आला. या शुभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोकराव बावणे, सचिव देखकर त्यांचे सहकारी प्रकाश गोरे हजर होते.

शिवम् कॉटन कमिशनचे सहकारी, मुनीम श्री. लक्ष्मणजी लोखंडे हजर होते. शेतकऱ्यांना शिवम् कॉटन कडुन शक्य ती मदत करण्याचे डॉ. प्रकाश खनके यांनी बोलून दाखविले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये