ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय अँथलेटिक्स दौड स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्सची कु. स्नेहल फटिंग हिचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे विसापूर येथील  अटलबिहारीं वाजपेयी क्रीडा संकुल येथे दी.२ व ३ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित जिल्हास्तरीय अँथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत ५० मीटर व १०० मीटर दौड़ स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ४ ब्रम्हपुरीची विद्यार्थिनी वर्ग तिसऱ्या वर्गातील कुमारी स्नेहल हेमंत उर्फ होमराज फटिंग रा. कुर्झा वार्ड विद्यानगर ब्रम्हपुरी या विध्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन करीत आपल्या शाळेचे व ब्रम्हपुरीचे नावलौकिक केले आहे.

जिल्हास्तरीय विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारात शालेय मुला-मुलींनी सहभाग घेतलेला होता त्यात कुमारी स्नेहल हिने कमी वयात संपादन केलेल्या यशाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे आपल्या विजयाचे श्रेय तिने सर्वप्रथम वडील हेमंत फटिंग,आई अश्विनी फटिंग व परिवाराला दिला तसेच प्रशिक्षक. पि. आर.डी.स्पोर्ट्सचे संचालक श्री राहुलजी जुआरे सर शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण चौधरी सर,वर्गशिक्षिका वलारकर मँडम, शेबे सर,शिवनकर सर,चौधरी मँडम यांना दिला आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये