चंद्रपूरात दोन बछड्यांचा मृत्यू ; एक जिवंत मिळाला
बल्लापूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रातील घटना

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्ह्यात दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले तर एक अशक्त बछडा जिवंत आढळून आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्य जीवन केंद्रात जिवंत बछड्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. बल्लापूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रात कर्मचारी गस्तीवर असताना आज गुरूवारी (7 सप्टेंबर) ला दोन मृतक व एक जिवंत बछडा आढळून आला.
आज गुरूवारी बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रामध्ये क्षेत्रीय कर्मचारी गस्तीवर असतांना नियतक्षेत्र कळमना मध्ये 572 मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसुन आला. त्याला तत्काळ रेसक्यु करुन प्राथमीक उपचाराकरीता ताडोबाच्या वन्यजीव उपचार केन्द्रात दाखल करण्यात आले. बछडा ही मादी असुन ती अंदाजे 5 महिन्याची आहे. तिला वन्यजीव उपचार केन्द्रात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निगरानीत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्याच परिसरात अनय ठिकाणी दोन वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळुन आले. मौका पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये मृतक वाघाचे बच्छड्याचे शव ताब्यात घेवुन शवविच्छेदना करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर येथे पाठविण्यात आले आहे. दोन्ही बछड्यांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार, व पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप पी. जांभुळे यांनी केले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे नेमके कारण समोर येणार आहे.
या प्रकरणाचा तपास उपवनसरंक्षक श्रीमती श्वेता बोड्डु, सहायक वनसंरक्षक शेख तौसीफ शेख हैदर यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी नरेश भोवरे, करीत आहे. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता क्षेत्र महाय्यक बि. टि. पुरी, वनरक्षक एस.पी. नन्नावरे, पि.एच. आनकाडे, एम. जी. धाईत, भारती तिवाडे, एस. एस. नैताम, टि.ओ. कामले. एस. एम. बोकडे, ए.बी. चौधरी व कळमणा व किन्ही येथील पिआरटी चमूने सहकार्य केले.