ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तांदूळ भरलेल्या ट्रकला अपघात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रह्मपुरी-वडसा रोडवर दिनांक 7/9/2023 ला एका तांदूळ भरलेल्या ट्रकला अपघात झाला.

सदर अपघातात कोणतीही जीवित व वित्तीय हानी झाली नाही. सविस्तर वृत्त की ब्रह्मपुरी-वडसा रोडवर असलेल्या एका राईस मिल मधून तांदूळ भरून तो नागपूरच्या दिशेने जात असताना ब्रह्मपुरी येथील टिळक नगर चढावा जवळ ट्रक मध्ये तांत्रिक बिघाड झाला व रस्त्याच्या कडेवर असलेल्या झाडावर ट्रकची धडक लागून ट्रक पलटी झाला. ट्रक मधील चालक व वाहक दोघेही सुखरूप होते कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

मात्र, रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीला बाधा निर्माण झाली. घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळताच वाहतुक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. या घटनेची माहिती राईस मिल मालकाला मिळताच त्यांनी तात्काळ दुसरा ट्रक व राईस मिलमधील कामगार आणुन अपघातग्रस्त ट्रक मधील तांदूळ हलविण्याचे कार्य तत्परतेने केले. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये