ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना व परसोडा येथे सट्टापट्टी व दारू विक्री जोमात सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा परिसरात व परसोडा येथे अनेक दिवसापासून सट्टापट्टी सुरू आहे या सट्टापट्टीमुळे शाळेकरी मुले शाळेत न जाता सट्टापट्टे लावले जात असल्याची माहिती सुज्ञ नागरिकाकडून मिळत आहे तसेच मनमजुरी करणारे महिलेच्या पती मन मजुरी कराले न जाता पत्नीच्या मजुरी करून आणलेले पैसे मागून सट्टा पट्टी लावण्याकरिता येत आहे यामुळे महिलांना सुद्धा ना हा त्रास होत आहे हे सट्टापट्टी कुणाच्या आशीर्वादाने चालत आहे अशी चर्चा शुद्ध नागरिक करीत तसेच कोरपणा नगरीत व अनेक खेडोपाडी बिनधास्तपणे दारूचे दुकान चालू आहे.

यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी दारूच्या व्यसनात जात आहे त्यामुळे गावागावात गुन्हेगारी प्रवृत्तीने मोठ्या प्रमाणात जोर वाढत आहे यामध्ये या व्यवसायाकडून मजोरी होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे कोरपणा ठाणे हद्दीत अवैद्य धंदे सुरू असून सुद्धा याकडे दुर्लक्ष का असा प्रश्नचिन्ह नागरिकांना होत आहे जर सट्टा पट्टी दारू विक्री कोंबडा बाजार अवैध रेती असे अनेक अवैध धंदे बंद न झाल्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन करणार असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय बोरडे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये