महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा प्रचंड उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
रविवार दिनांक १८जानेवारी २०२५ला बालाजी सेलिब्रेशन गडचांदूर येथे आदरणीय जी.जी.धोटे सर, जिल्हा नेते चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तालुका शाखा कोरपना,जिवती व राजुरा यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
शिक्षकांचे पंचप्राण माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांचे प्रतिमेत माल्यार्पण व अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली.
राज्य कार्याध्यक्ष माननीय लोमेशजी व-हाडे यांचे प्रथम आगमनानिमित्य त्यांचा जिल्हा शाखा चंद्रपूर घ्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकांचा माननीय धोटे सर,व माननीय व-हाडे सर यांचे हस्ते मारोती निरे, नानाजी फडताडे, रामकृष्ण मोहितकर, साहेबराव देवाळकर व इतर शिक्षकाचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आदरणीय सेवानिवृत्त शिक्षकांची प्रचंड उपस्थिती उर्जादायी होती.
उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार
राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
श्री.गिरीधर पानघाटे,,
श्री बंडूजी राठोड
श्री निलकंठ मडावी
सौ.मंगला चटप
श्री.उद्धव पवार
श्री.संजय निखाडे
व इतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
संघटना प्रवेश सोहळा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य व जिल्हा नेतृत्वावर विश्वास ठेवून वजनदार शिक्षक नेत्यांनी आज राज्य संघात प्रवेश घेतला.
श्री विलास जी कुडे
श्री चंद्रकांत जी पांडे संचालक शासकीय/अर्धशासकीय सेवकांची पतसंस्था, राजुरा
श्री.मोहनदास वाभिटकर
श्री.निलकंठ मडावी
श्री प्रमोद गावंडे संचालक प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्था गडचांदूर
श्री.गोविंदप्रसाद गुप्ता
श्री.मनोज सातभाई
श्री.रविंद्र मिलमिले
श्री.निळकंठजी फावडे
श्री.मधुकर चव्हाण व इतर मान्यवर शिक्षक बंधूंनी आजच्या महामंडळ सभेत प्रवेश घेतला.
आजच्या कार्यक्रमाला माननीय व-हाडे सरांसह माझे गुरुवर्य माननीय भोस्कर सर,मान.विठ्ठल आवारी सर सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय फरताडे सर, माननीय बुरांडे सर,सावली पतसंस्थेचे अध्यक्ष मान.सुरेश जिल्हेवार सर, माननीय रवी कांबळे सर, माननीय भास्कर चौधरी सर,भक्त दास कांबळे सर,स्वप्नील डोईजड सर,अरुण बावणे,लहुजी नवले, महिला आघाडीच्या कुमारी सविता येथे,सौ.मंगला चटप उपस्थित होत्या.
उपस्थित शिक्षक बांधवांना सुभाष बेरड जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मान.भोस्कर सर यांनी मार्गदर्शन केले.
आजचे विशेष अतिथी माननीय लोमेश व-हाडे सर राज्य कार्याध्यक्ष यांनी संघाचा इतिहास,व स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांचे जीवन दर्शन सांगितले.तसेच शिक्षक समस्या राज्यावर व जिल्ह्यात शिक्षक संघ कसा सोडवितो व शिक्षकांना न्याय देतो हे प्रत्यक्ष उदाहरणे देऊन समजावून दिले.
अध्यक्षीय भाषणात आदरणीय धोटे सरांनी संघाचे कार्य,शिक्षकांची प्रामाणिकता यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.शंकरराव तलांडे ता.अ.कोरपना श्री.विठ्ठलराव आवंडे सरचिटणीस कोरपना श्री.बंडूजी राठोड ता.अ.जिवती श्री.सुनील चव्हाण सरचिटणीस जिवती.श्री.गिरीधर पानघाटे, श्री.सुभाष पांचभाई, श्री.उमेश लांजेवार, श्री.दिलीप साखरकर, श्री.मनीराम सोयाम,धर्मा उदे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन कृष्णा गरजे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.



