ऑपरेशन निशाना अन्तर्गत अवैद्य गावठी मोहा दारु भट्टीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही
एकूण 4 लाख 20 हजारावर मोहा सडवा रसायन मुद्देमाल जागीच नष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी पोलीस दि. 18/01/2026 रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब याचे ऑपरेशन निशाना मोहीम अन्तर्गत पो स्टे सावंगी मेघे परीसरात सराईत गुन्हेगार चेक करणेकामी पो.स्टे.परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीर कडुन खात्रीशिर खबर मिळाली की, मौजा येळाकेळी येथे राहणारा सतीश शेंडे हा मौजा कारला परीसरात धाम नदीच्या काठावर असलेल्या मोकळ्या जागेत गावठी मोहा सडवा रसायनाची साठवणुक करून गावठी मोहा दारू काढते अशा खबरेवरून पंच व पी स्टॉफसह, पंच व पो स्टॉफसह खबरे प्रमाणे मौजा कारला परीसरात धाम नदीच्या काठावर खाजगी वाहनाने गेलो असता वाहणे शेताचे बाजुला लावुन पायदळ पायदळ मौजा कारला परीसरात धाम नदीच्या काठावर गेलो असता तेथे सतीश शेंडे यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो मौक्यावरुन पसार आला.
पंचासमक्ष मौक्यावर सदर जागेची पाहणी केली असता मौक्यावर जमीनी मध्ये व जमीनीचे वर 1) 03 मोठ्या लोखंडी ड्रम मध्ये कच्चा मोहा सडवा रसायण भरून असलेले प्रती ड्रम 300 लिटर प्रमाणे एकुण 900 लीटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रति लिटर 200/-रू प्रमाणे 180000/-रू 2) 04 मोठ्या प्लॉस्टीक ड्रम मध्ये कच्चा मोहा सडवा रसायण भरून असलेले प्रती ड्रम 300 लिटर प्रमाणे एकुण 1200 लीटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रति लिटर 200/-रू प्रमाणे 240000/-रू असा एकुण जु.कि. एकुण 420000/-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे व.नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.



