ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कलाकार सतैय्या मलारप यांची नियुक्ती

नियुक्तीमुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल - राजेंद्र वैद्य

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी चंद्रपुरातील युवा कार्यकर्ते श्री.कलाकार सतैय्या मलारप यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबई येथील पक्षकार्यालयात केली.याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख देखील उपस्थित होते.
       कलाकार मलारप हे आ.किशोर जोरगेवार यांच्या “यंग चांदा ब्रिगेडच्या” युवा संघटनेचे अध्यक्ष होते,मागील आठवड्यात त्यांनी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या मागील अनेक दिवसांपासून ते संपर्कात होते.शहरातील  युवकांचे मोठं संघटन  कलाकार मलारप यांच्या पाठीशी आहे.या नियुक्तीमुळे चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास राजेंद्र वैद्य यांना आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये