सोमय्या ग्रुप येथे १५ ऑगस्ट दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित MSPM ग्रुप वडगाव येथे १५ ऑगस्ट दिवस साजरा करण्यात आला, MSPM संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य अनिल खुजे, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजचे प्राचार्य. डॉ. पद्मनाभगाडगे, उपप्राचार्य डॉ. हिरेंद्र हजारे, सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. इंगळे सर, प्रायव्हेट आय.टी.आय. कॉलेजचे प्राचार्य जोगी, रजिस्टर राजेश बिसन सर उपस्थित होते, सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस., आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रीय गीत, फ्लॅग सेल्यूट, भाषण, देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एस. आंबटकर यांनी मार्गदर्शन करित असतांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले, येणाऱ्या आजच्या सर्वच पिढीतल्या जनतेसाठी १५ ऑगस्ट हे वर्ष म्हणजे एक ऐतिहासिक असे वर्ष म्हणून ओळखण्यात येते आणि या महत्वपूर्ण अशा पवित्र दिवसाच्या आठवणी आपण दरवर्षी सुवर्ण दिवसाला १५ ऑगस्टला ” स्वातंत्र दिन म्हणून उत्सहात साजरा करतो यामागे भारताचा स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरानी आपल्या प्राणाची आहुती दिली.
भारत देश आज जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला महासत्ता देश आहे. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रन्तिकारक, स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, जात अजात देश वासियांनी प्राणांची आहुती दिली, त्याच्या त्यागामुळेच स्वातंत्र्याची पहाट उगवली, सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. आज अखेर आपल्या देशाने अनेक संकटावर मात केली आहे, लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे.
तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एकमेकांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक यादव यांनी केले.