लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा

चांदा ब्लास्ट
लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,चंद्रपूर.शाखा इमारत सिव्हिल लाईन येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव मा. श्री. सराफ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण व भारत मातेचे पूजन करण्यात आले. मंडळाचे सदस्य ॲड. श्री. घट्टुवार साहेब, मुख्याध्यापिका श्रीमती पाटील मॅडम, उप मुख्याध्यापक श्री राजपुरोहित सर, पर्यवेक्षक श्री जहागीरदार सर आणि पर्यवेक्षिका सौ देगमवार मॅडम मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांची यथोचित भाषणे झाली. सचिव साहेब आणि वरिष्ठ शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.मुख्याध्यापिका श्रीमती शैलजा पाटील यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली. ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालकवृंद,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.