ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एल.अँड.टी कंपनीमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

एल.अँड.टी स्किल  ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल (मुंबई) यांच्या माध्यमातून वीजतंत्री, वायरमन, कारपेंटर, वेल्डर आणि गवंडी या व्यवसायाचे आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना  उच्च प्रशिक्षण घेण्याची  तसेच रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. वरील सर्व व्यवसायाचे तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर  एल अँड टी कंपनीमध्येच रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या व्यवसायाच्या उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा येत्या १६ जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथील कौशल्यम  सभागृहात ठेवलेली आहे, असे कंपनीचे प्रतिनिधी तेजराव पाटील यांनी कळविले आहे. तरी या  संधींचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा,  असे आवाहन  संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये