ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बरांज तांड्यात अवैध दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा

२.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मौजे बरांज तांडा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू निर्मिती व विक्रीविरोधात परिविक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी धडक कोंबिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत तीन ठिकाणी छापे टाकून तब्बल २६०० लिटर गुळाचा सडवा आणि ६५ लिटर गुळांबा दारू, असा एकूण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बरांज तांडा परिसरात कारवाई केली. पहिल्या कारवाईत सुनीता रवी पाटील (३७) हिच्याकडून ६०० लिटर गुळाचा सडवा व ५ लिटर गुळांबा दारू जप्त करण्यात आली. दुसऱ्या कारवाईत भद्रीबाई इराय्या पवार (५५) हिच्याकडून ४०० लिटर गुळाचा सडवा व २० लिटर गुळांबा दारू, तर तिसऱ्या कारवाईत बाली रवींद्र इस्लावत (४०) याच्याकडून तब्बल १००० लिटर गुळाचा सडवा व ४० लिटर गुळांबा दारू जप्त करण्यात आली.

पंचांसमक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या धडक कारवाईमुळे बरांज तांडा परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन अधिकारी सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय विरेंद्र केदारे, पीएसआय संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंद्रे, विजय तलांडे, देवानंद डुकरे, गोपाल अत्कुलवार, तसेच पोलीस अंमलदार प्रेम बावनकर व योगेश घुगे यांच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये