Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जाफराबाद चौफुलीवर झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू 

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जाफराबाद चौफुलीवर 11डिसेंबर रोजी रात्री 10.45 वाजता झालेल्या कार अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालक विरोधात आज 24 डिसेंबर रोजी दुपारी 3.45वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की  फिर्यादी सौ मनीषा संजय चौधरी रा बुलढाणा ह्या त्यांचे पती, मुलगा व ननंद गं.भा. मिना तुळशीराम हिवाळे वय 45 वर्ष रा. बुलडाणा यांचेसह त्यांची टाटा कंपनीचे टियागो कार क्रंमाक एम एच 28 ए झेड 0824 ने संभाजीनगर येथे फिर्यादीचा दवाखाना करुन बुलढाणा येथे परत येत असतांना जाफ्राबाद चौफुलीवर असलेल्या टर्निंगजवळ त्यांचे कार पुढे अचानक निलगाय आल्यामुळे, त्या निलगायीला वाचविण्यासाठी फिर्यादीचे पतींनी कारचा वेग कमी केला. तेवढ्यात मागील बाजुने भरधाव वेगाने आलेले अज्ञात वाहन चालकांने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे कारला मागील बाजुने जोरात धडक दिली.

त्यामुळे त्यांचे कारचा अपघात होवुन त्यामध्ये कार क्षतीग्रत होवुन नमुद फिर्यादी, त्यांचे पती व मुलगा हे किरकोळ जखमी झाले व ननंद मिना तुळशिराम हिवाळे गंभीर जखमी झाल्या, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अपघाताची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालक विरोधात आज गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गवई करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये