ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथे भोई समाज सभागृहाचे लोकार्पण.

खा. प्रतिभा धानोरकर व आ. सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे सर्वमान्य आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने पुर्णत्वास आलेल्या कोरपना तालुक्यातील मौजा लखमापूर येथे २० लक्ष रुपये निधीच्या भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते आणि लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले तसेच विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

         या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, महिला अध्यक्षा आशाताई खासरे, अखिल भारतीय भोई समाज जिल्हाध्यक्ष क्रिष्णाजी नागापुरे, आदिवासी नेते श्यामराव कोटणाके, सरपंच अरुण जुमनाके, उपसरपंच संभाजी टेकाम, जंगु पा. येडमे, श्रीहरी शेंडे, सुरेश मालेकर, प्रा. आशिष देवकर, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, शुभम थिपे, पुरुषोत्तम पिंपळशेंडे, प्रमोद सिडाम, सुधीर थिपे, भोयर सर, सुरेश केसूळकर, संदीप बावणे, शुभम उरकुडे, सुशील शिंदे, नितीन जुनघरे, आशाताई काकडे, ज्योती जेनेकर, रूपाली बोबडे, गिरजाबाई मडावी यासह कोरपना, लखमापूर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये