ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती

ग्रामीण रूग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत,रूग्णांची होतेय हेळसांड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- नागरिकांच्या आरोग्यासाठी शासनाने जिवती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलेे. मात्र हे आरोग्य केंद्रच समस्यांनी घेरलेले आहे. तेथे रुग्णांवर उपचार करायचे की, प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करायचे? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.

आरोग्य केंद्राच्या इमारतीला लागलेली गळती व आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गावकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित असेल का? हा प्रश्न उपस्थित होत आहे तर याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद दुर्लक्ष का करीत आहे ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आता पावसाळा सुरू असल्याने जिल्हा परिषदेने तात्काळ या आरोग्य केंद्राची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पुर्णतः जीर्ण झाली आहे.स्लॅबचे छतही खराब झाल्याने स्लॅबमधून पाणी झिरपत असल्याने उपचारासाठी ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे.मागिल आठवडाभरापासून सर्वत्र पावासाचा कहर सुरू आहे.सततच्या पावसाची रिपरिप सुरूच असल्याने मच्छर,डासांचे प्रमाण वाढल्याने हिवताप,मलेरिया,डायरिया सारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे उपचारांसाठी रूग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोजच गर्दी पाहायला मिळत आहे मात्र मुख्य इमारतीच्या स्लॅबमधून थेंब थेंब पाणी गळत असल्याने उपचारासाठी आलेल्या रूग्णासह आरोग्य कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा करावा लागत असून संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन नविन बांधकाम झालेल्या ग्रामीण रूग्णालयाचे उद्घाटन व पदभरती करून आरोग्य सेवा देण्याची मागणी केली जात आहे.

गाव-खेड्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावा, योग्य सोयी-सुविधा तसेच आर्थिक भुर्दंड व वेळ वाचावा यासाठी जिवती येथे ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल अडीच वर्षांनंतरही ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे या ग्रामीण रूग्णालयाच्या इमारती बाबत संबंधित विभागाने काम अर्धवट असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यामुळे उद्घाटनाच्या कामात विलंब होत असल्याचे अधिकारी सांगत असले तरी जिवती येथील नवनिर्माण ग्रामीण रूग्णालय इमारतीचा संपूर्ण काम पूर्ण झाल्याचा व्हिडिओ पुरावा म्हणून जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून तात्काळ पदभरती करून ग्रामीण रूग्णालय सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.जिवती तालुका संपूर्ण गावांच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी नेहमीच नागरीकांची व रूग्णांची वर्दळ असते मात्र जिवती आल्यानंतर रूग्णांना सोयी-सुविधा मिळत नाही, औषध पुरवठा राहत नाही.त्यामुळे रूग्णांना रेफर केले जात असल्याने रूग्णांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.येथील ग्रामीण रूग्णालय तातडीने सुरू करण्यासाठी जिवती तालुका भुमिहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून नवरत्नांनी उपोषण केले त्यावेळी ग्रामीण रूग्णालयात पदभरती करून लवकरच ग्रामीण रूग्णालय नागरीकांच्या सेवेत आणू असे आश्वासन दिले मात्र त्या आश्वासनाची पुर्तता करता आली नाही हि शोकांतिका आहे

• प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी कर्मचारी यांचे हस्तांतर नवीन ग्रामीण रुग्णालयात करून नवीन ग्रामीण रुग्णालय चालू करण्यात यावे,अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल.

– दयानंद राठोड, सामाजिक कार्यकर्ता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये