ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अज्ञात आरोपी निष्पन्न

दोन आरोपीतांना अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०८/१२/२०२५ रोजी फिर्यादी नामे श्री. सतीष साहेबराव देशमुख, वय ५७ वर्ष, रा. हाउसिंग बोर्ड कॉलनी, वार्ड क. ०९. जुना पुलगाव ता. देवळी जि. वर्धा यांनी पो.स्टे. पुलगाव जि. वर्धा येथे रिपोर्ट दिली की, दि. ०७/१२/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे घरी हजर असतांना त्यांचे मोहल्यातील राहणारा अक्षय मेटे याने त्यांचे घरी येवून सांगितले कि, श्री. संत गजानन महाराज संस्थान, जुना पुलगाव येथे कामावर असलेले जखमी नामे रामराव माधवराव देवतळे, वय ७० वर्षे, रा. विरूळ आकाजी, ता. आर्वी, जि. वर्धा याला कोणीतरी अज्ञात इसमांनी पोटावर घाव मारून गंभीर जखमी केले आहे. अशा माहीती वरून फिर्यादी हे श्री. संत गजानन महाराज मंदीर संस्थान, जुना पुलगाव देवस्थान कडे जात असता जखमी है मंदीराचे गेट जवळ जखमी अवस्थेत बसून असल्याचे दिसून आल्याने फिर्यादी व वस्तीतील लोकांनी मिळून जखमी यास ग्रामीण रूग्णालय, पुलगाव येथे उपचारकामी घेवुन गेले असता जखमी याने त्यांना मंदीरात तिन ईसम आले व त्याचे पोटावर चाकुने घाव मारुन गंभीर जख्मी केले, असे सांगितले, वैदयकीय अधिकारी, ग्रा. रू. पुलगाव यांनी प्राथमिक उपचार करून जखमी यास पुढील उपचाराकरीता कस्तुरबा रूग्णालय, सेवाग्राम व तेथून पढील उपचारा करीता मेडील कॉलेज नागपुर येथे रेफर केले. तीन अज्ञात इसमांनी जख्मी यास जिये मारण्याचे उद्देशाने चाकुने पोटावर मारून गंभीर जखमी केले अशा फिर्यादी यांचे तकार व जखमी यांचे इंन्जुरी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पुलगाव जि. वर्धा येथे अप. कमांक ९५१/२०२५ कलम १०९(३) (५) वि. एन.एस २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जख्मी नामे रामराव माधवराव देवतळे, वय ७० वर्षे, रा. विरूळ आकाजी, ता. आर्वी, जि. वर्धा यांचा मेडीकल कॉलेज, नागपुर येथे उपचार सुरु असतांना दिनांक ०९/१२/२०२५ रोजी उपचारा दरम्याण त्याचा मृत्यु झाला.

सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांनी गुन्ह्यातील अज्ञात फरार आरोपीतांचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना आदेशीत केल्याने, सदर गुन्हयातील घटना तारखेपासुन अज्ञात फरार असलेला आरोपीतांचा परीसरात कसोशीने शोध घेत असता तांत्रिक पध्दतीचा वापर करुन व गोपनिय बातमीदार यांचे कडून माहिती प्राप्त झाली की, अंदाजे ६ महिन्यापूर्वी मृतक नामे रामराव देवतळे याचे लहान भावाची पत्नी रा. विरुळ, ता. आर्वी जि. वर्धा हिचा पती मरण पावल्याने तिने तिचे नात्यातील आरोपी नामे गजानन भिमराव काळे, रा. भाडेकर लेआऊट सिंदी (मेघे), वर्धा याचे सोबत प्रेमसंबंध जुळल्याने आपटी येथील दुर्गा माता मंदीरात जावुन पती पत्नी म्हणून ऐकमेकांचे गळयात हार घातला होता.

या कारणावरुन मृतक याने त्याचे भावाची पत्नी रा. विरुळ, ता. आर्वी जि. वर्धा व तिचे वडील नामे किसना नध्युजी शिंदे, रा. विटाळा, ता. चांदुर (रेल्वे), जि. अमरावती यांना दगडाने मारहान करुन गंभीर जखमी केल्याने ती मागील ६ महिन्या पासुन वैद्यकीय उपचार घेत आहे. अशा माहीती वरुन आरोपी नामे गजानन भिमराव काळे, रा. भांडेकर लेआऊट सिंदी (मेघे), वर्धा याचा शोध घेतला असता तो मौजा रोहणी, ता. देवळी, जि. वर्धा येथील शेत शिवारात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस केली असता त्याने त्याची पत्नी रा. विरुळ, ता. आर्वी जि. वर्धा हीचे सोवत मृतकाने केलेल्या त्याचा राग मनात धरुन त्याने त्याचे दोन साथीदारा नामे १) प्रविण साहेबराव वानखेडे, रा. कावली वसाहत, तह. धामनगांव, जि. अमरावती ह.मु. दिवा मुंबई, व २) प्रज्वल राजेश खराणे, वय १९ वर्ष, रा. जुनी म्हाडा कॉलणी आय.टी.आय. चौक, आर्वीनाका, वर्धा यांचे सह त्यांचे जवळ असलेली चारचाकी गाडीने दिनांक ०७/१२/२०२५ रोजी रात्री २०/३० वा. दरम्याण श्री. संत गजानन महाराज मंदीर संस्थान, जुना पुलगाव येथे येवुन जखमी पास जिवाने ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे जवळ असलेल्या चाकुने पोटावर वार करुन गंभीर जखमी करून पळून गेले. अशी माहिती दिल्याने त्वास व आरोपी क्रमांक २) प्रज्वल राजेश खराणे, वय १९ वर्ष, रा. जुनी महाडा कॉलणी आय.टी.आय. चौक, आर्वीनाका, वर्धा यास ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन पुलगाव यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशीव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पो. उप नि. बालाजी लालपालवाले, राहुल इंटेकार, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विनोद कापसे, मंगेश आदे, अक्षय राउत, गोविंद मुंडे, सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये