ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर नगर परिषदे द्वारा विविध कार्यक्रमाचे आयोजन

अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट "मेरी मिट्टी मेरा देश : मिट्टी को नमन वीरो को वंदन" अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट “मेरी मिट्टी मेरा देश : मिट्टी को नमन वीरो को वंदन” अभियान शुभ-पर्वावर पालिकेने विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहे. या अनुषंगाने नगरपरिषद भद्रावती द्वारा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दि. 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 या कालावधीत “मेरी मिट्टी मेरा देश – मिट्टी को नमन वीरो को वंदन” अभियान राबविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने जनतेत आपल्या मातीविषयी जागृती, प्रेम साक्षरता निर्माण व्हावी या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा या दृष्टीने सदर अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने हातात मातीचे दिवे घेऊन किंवा माती घेऊन पंचप्रण शपथ घ्यायची असून सदर सेल्फी मेरी माटी मेरा देश या पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. भारतीय शूर वीर सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ या अभियाना निमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नगरपरिषद भद्रावतीच्या वतीने दि. 9 ऑगस्ट ला सकाळी १० वाजता पंचप्रण शपथ घेण्यात आली तसेच शीला फलक अनावरण 10.15 वाजता, ध्वजारोहण व राष्ट्रगीत गायन 10.30 वाजता व हुतात्मा दिन 10:45 वाजता सर्व नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचारी वृंद तसेच सर्व नागरिकांच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडण्यात आला. दिनांक 14 ऑगस्ट 2023 ला वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात येणार आहे तसेच स्वातंत्र्य, सैनिक वीरांना वंदन करण्याकरिता नगरपरिषद सभागृहात दिनांक 14 ऑगस्ट 2023 ला दुपारी 1 वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.
हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 ला या कालावधीतील मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा हर घर तिरंगा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी मागील वर्षाप्रमाणे दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत नागरिकांनी स्वपुर्तीने राष्ट्रध्वज उभारावा. 15 ऑगस्ट 2023 ला नगरपरिषद भद्रावतीच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने भद्रावती भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मुरलीधर पाटील गुंडावार येथे सायंकाळी 6.00 वाजता करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान नगर परिषदेचे अध्यक्ष मा. अनिल भाऊ धानोरकर व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये