ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील प्राचार्या स्मिता ताई चिताडे सेवानिवृत्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिता ताई चिताडे 35वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31मे ला सेवानिवृत्त झाल्या ,

संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन भावपुर्ण निरोप देण्यात आला,

याप्रसंगी संस्थेचे संचालक तथा राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर चे प्राचार्य डॉ अनिल चिताडे, संस्था सचिव धनंजय गोरे,उपाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, संचालक विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, विज्ञान महाविद्यालय चे प्राचार्य डॉ शैलेंद्र देव, महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव सूर्याचा येथील प्राचार्य साईनाथ मेश्राम,सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बत्तुलवार, सेवानिवृत्त उप प्राचार्य प्रा विजय आकनुरवार, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक शंकरराव तुराणकर, सौ विना देशमुख, तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये