ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्कार प्रकाशन लातुरच्या वतीने प्राचार्य संजय ठावरी यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 नवनिर्मिती बहुउद्देशीय संस्था लातुर द्वारा संचालित संस्कार प्रकाशन चे वतीने ज्युनीअर आयएएस स्पर्धा परीक्षा 2023 च्या गुणवंत विद्यार्थीचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 10 डिसेंबर ला लातूर येथे दयानंद सांस्कृतिक सभागृहात पार पडला.प्रारंभी प्रतिमापूजन दिपप्रज्वलन झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान. डॉक्टर महादेवराव गव्हाने प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर ,प्रमुख अतिथि मान. युवराज पाटिल जिल्हा माहिती अधिकारी लातुर प्रमुख अतिथि प्राचार्य मधुकरराव गायकवाड माजी कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ,डॉक्टर नरेशचंद्र काठोडे संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकैडमी अमरावती, माननीय ओमप्रकाश जाधव सदस्य मानव्य विद्या शाखा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तथा संचालक संस्कार प्रकाशन तथा ज्युनीअर आयएएस स्पर्धा परीक्षा ,संजय ठावरी सेवानीवृत प्राचार्य वसंतराव नाईक महाविद्यालय चंद्रपुर, प्रा. पाटील मंचावर उपस्थित होते संचालन साठे सर, जाधव सर ,कुलकर्णी सर यांनी केले संस्कार प्रकाशन द्वारा जानेवारी 2023 ला दूसरी ते सातवीसाठी मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमाच्या राज्यभरातून घेन्यात आलेल्या परीक्षेत राज्यस्तरीय पात्र शेकडो गुणवंताना पारितोषिक, सम्मान चिन्ह, प्रमानपत्र प्रदान करण्यात आली.

चंद्रपुर जिल्ह्यात ज्युनिअर आयएएस स्पर्धा परीक्षाचे आयोजित करुण मुलाना लहान वयात स्पर्धा परीक्षाची जानिव जागृति निर्माण करुण देनारे प्राचार्य संजय ठावरी यांचाही त्यांचे कार्यबद्दल ओमप्रकाश जाधव सर यांनी सत्कार केला. त्याचप्रमाने विविध शालाप्रमुख, मार्गदर्शक शिक्षक यांचाही सम्मान करण्यात आला. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी पालकानी सभागृह भरून गेले. सत्काराने विद्यार्थी व त्यांचे आईवडील यांचा आनंद ओसंडून वहात होता. या स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून मि काहीतर बननार हा आशावाद घेऊन मुले जिद्दीने पुढ येतील यात शंका नाही. प्रकाशनाद्वारा गेल्या दहा वर्षापासूंन विद्यार्थीसाठी अभासक्रम वर आधारित स्पर्धा परीक्षाचे आयोजन होत आहे.वेध भविष्याचा उपक्रमांतर्गत बाविस जिल्हात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषनातून प्राचार्य गव्हाने सर यांनी पालकाना उपदेश केला की मूलांकडे विशेष लक्ष दया. उद्याचे ते प्रशासकियअधिकारी आहेत ,ते जरी झाले नाहित तरी सक्षम नागरिक नक्की होतील असा आशावाद व्यक्त केला. भावी पीढी घडवन्यात मोलाचे कार्य करित असलेल्या ओमप्रकाश जाधव यांचे भरभरूण कौतुक केले. जास्तीत जास्त विद्यार्थीनी परिक्षेस प्रविष्ठ व्हावे असे आवाहन आयोजकानी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये