देऊळगाव राजा नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळ यांची पदोन्नती ; उपायुक्त पदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बालाजी महाराज यांच्या पावन नगरी देऊळगाव राजा येथील नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना शासनाने मुख्याधिकारी गट अ/ उपायुक्त पदी पदोन्नती केली आहे.
देऊळगाव राजा शहराचा न भूतो भविष्यती असा विकास त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केला, देऊळगाव राजा येथील मुख्य महामार्गावरील कित्येक वर्षांपासून झालेले अतिक्रमण काढून महामार्ग मोकळा करून मोठा प्रश्न सोडविला, शहराचा सर्वांगीण विकास केला, सिमेंट रोड व नाली बांधकाम केले, तत्कालीन आमदार डॉ शशिकांत खेडेकर, डॉ राजेंद्र शिंगणे, व विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली, प्रशासनात वेगळा ठसा उमटवून लोकप्रियता मिळवली, शहरात सुद्धा ते लोकप्रिय ठरले, त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल नगर परिषद च्या अध्यक्षा माधुरीताई शिपणे, उपाध्यक्ष वनीताताई भुतडा, गटनेते, सभापती, इतर नगरसेवक तसेच अधिकारी व कर्मचारी व शहरातील विविध सामाजिक संघटना, तालुका पत्रकार संघ यांनी शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



