जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचा अभिनव उपक्रम : ‘लाडकी लेक स्वागत योजना’ सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : मुलींच्या जन्माचे स्वागत करत समाजात मुलींबाबत सकारात्मक संदेश देण्यासाठी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी ग्रामपंचायतीने “लाडकी लेक स्वागत योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना १ जून २०२६ पासून लागू होणार असून, त्या दिवसापासून जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या कुटुंबाला १५०० रुपये प्रोत्साहन रक्कम ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंब ग्रामपंचायत बिबीचे रहिवासी व नियमित करदाते असणे आवश्यक आहे. तसेच मुलीच्या जन्माची नोंद ३० दिवसांच्या आत करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. मंजुरीनंतर प्रोत्साहनाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
‘लेक आली घरा, करू आनंद साजरा’ या घोषवाक्यासह सुरू करण्यात आलेली ही योजना मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याबरोबरच समाजात मुलींचा सन्मान व समानतेचा संदेश देणारी ठरणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर अशा स्वरूपाचा अभिनव निर्णय घेतल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
मुलगी ही केवळ कुटुंबाचा आनंद नसून समाजाच्या प्रगतीचा भक्कम पाया आहे. तिच्या जन्माचे स्वागत आणि सन्मान ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘लाडकी लेक स्वागत योजना’ ही मुलींबद्दलचा आदर आणि समानतेचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
— प्रा. आशिष देरकर
उपसरपंच, जिल्हा स्मार्ट ग्राम ब



