ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक एकल महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत बिबीत महिलांच्या सन्मानाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत बिबीच्या वतीने जागतिक एकल महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या माध्यमातून गावातील एकल महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, रोजगार व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माधुरी टेकाम या होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून आधारवेल महिला बहुउद्देशीय संस्था, गडचांदूरच्या संस्थापक उषा रितेश टोंगे यांनी एकल महिलांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी व विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा सौ. वंदना कातकडे, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, ग्रामपंचायत सदस्या भारती पिंपळकर, प्रणाली कोरांगे, अंजनाबाई काळे तसेच कमलाबाई ढवस यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच आर्थिक स्वावलंबन, संघटनबांधणी आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या भारती पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाला गावातील एकल महिला व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये