चाईल्ड पोर्नोग्राफी साहित्य ऑनलाईन विकणाऱ्या आरोपीस अटक
संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात तांत्रीक साधनांचा वापर करून गुन्हे करीत असलेल्या गुन्हेगारांना रंगेहात पकडण्याकरीता पोलीस विभाग सुध्दा तांत्रीकदृष्या सबळ झालेला असून सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉम्स्वर लक्ष ठेवण्यात येत असते. त्याकरीता राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोलीस विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या सोशल मिडीया इंटेलीजंस सेलचे माध्यमातून सोशल मिडीया प्लॅटफॉम्स्चा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यात येते.
दिनांक 04.12.2023 रोजी मा. पोलीस अधिक्षक वर्षा नूरूल हसन यांना वूमन सेफ्टी वींग व शी- भरोसा सायबर लॅब, तेलंगाणा यांचे कडून पोलीस स्टेशन पुलगांव हद्यीतील इसम नामे ओम राजेंद्रराव डाहाके हा लहान मूलांचे लैंगीक शोषणासंबंधीचे व्हीडीयो नाईट रायडर नावाचे टेलीग्राम चॅनलवर प्रसारीत करून 100 रूपयामध्ये 2 टी. बी. डाटा विक्री करीत आहे, अशी माहिती प्राप्त झाली. या माहितीवर तात्काळ कारवाई करण्याकरीता सायबर पो.स्टे.चे पो.नि. कांचन पांडे यांना नियूक्त करण्यात आले व तांत्रीक माहिती हस्तगत करण्यात आली.
संशयीताचे सर्व सोशल मिडीया अकाऊंट्स, चॅटींग, आय.पी. अॅड्रेस, डीव्हाईस आयडी, फेसबूक अकाऊंट लिंक, बैंक अकाऊंट व यू.पी.आय. ईमेल, फोटो अशी इत्यंभूत माहिती संकलीत करून दिनांक 07.12.2023 रोजी संशयीत इसम ओम राजेंद्रराव डहाके, वय 23 वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. गाडगे नगर, वार्ड क्रमांक 3, माणीक लेआऊट, नाचणगांव, ता. देवळी, जि. वर्धा, ह.मू. साईनगर, परसोडी रोड, धामणगांव, जि. अमरावती यांस धामणगांव येथून ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमाजवळ मिळून आलेल्या मोबाईलची प्राथमीक तपासणी केली असता सदर टेलीग्राम चैनल याच मोबाईलवरून चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने पो.स्टे. सायबर, जि. वर्धा येथे अप.क्र. 32/2023 कलम 67(ब) माहिती तंत्रज्ञान कायदा (सुधारीत) सन 2008 अन्वये होत गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हयात आरोपीकडून 2 मोबाईल हॅन्डसेट कि. 50,000/-रू जप्त करण्यात आले आहे व गुन्हयाचा पूढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरुल हसन व अपर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे पो.स्टे. सायबर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात स.पो.नि. संदीप कापडे, पो.हवा. निलेश कट्ट्टोजवार, वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, पो.हवा, कुलदीप टांकसाळे, अनूप राऊत, ना.पो.शि. विशाल मडावी, अक्षय राऊत, गोवींद मुंडे, अमीत शुक्ला, पो.शि. अंकित जिभे, प्रतिक वांदीले, म.पो.शि. स्मिता महाजन, लेखा राठोड यांचे मदतीने केली.