ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्टीलची तलवारीसह आरोपी एलसीबीच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट

 पोळा / तान्हा पोळा सनानिमित्य शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मा.पोलीस अधिक्षक सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे रात्रीला ऑलआउट मोहीम व गुन्हेगार शोधमोहीम पेट्रोलिंग करीत असताना,

मा.महेश कोंडावार, पो.नी. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पथक यांना गोपणिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली असता, छत्रपती नगर वार्ड क्र २, बियाणी नगर जवळ चंद्रपुर येथे राहणारा भुषण मोतिलाल उसरेटी वय ४३ वर्ष यांने आपले घरी धारधार स्टीलची तलवार लपवुन ठेवलेली आहे.

या खबरेवरून त्यांचे घरी छापा टाकला असता त्याचा घरातील बेडरूम मध्ये दिवाणचे खाली लपवुन ठेवलेली स्टीलची धारधार खाचे असलेली तलवार किं ५०००/- रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपी विरूध्द पोस्टे रामनगर येथे कलम ४२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची यशस्वी कामगीरी मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोअ. संतोष येलपुलवार, पो.अ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये