दत्तापूर येथे महसूल शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दत्तापुर सिंदखेडराजा मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभिमान सेवा पंधरवाडा अंतर्गत दिनांक 19 सप्टेंबर रोजी शिबीर संपन्न झाले, शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्र, व दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार, सरपंच जयश्री संदिप पवार डॉक्टर विजय राठोड, टेकाळे मंडळ अधिकारी, लहाने मॅडम, रोकडे मॅडम, इंगोले,निकस,चिबडे मॅडम,जिजा शेटकर ग्राम पंचायत सचिव, संजय सोनुने महसूल सहाय्यक निलेश कनखर डी स्टिक मॅनेजर, जयश्री वाघमारे, प्रमोद सोळंके, मनोज सोळंके, सतीश भोजने, अमोल आढाव,भरत आढे,प्रकाश सोनुने,राजु राठोड, विठ्ठल गोरे, उपस्थित होते, उत्पन्नाचे प्रमाणपत्र 96, नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 82,वय राष्ट्रीय प्रमाणपत्र 17वितरण करण्यात आले. सिदखेडराजा मंडळातील दत्तापुर येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी शिबिर आयोजित करण्यात आले होते.