ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून कामे मंजूर करा

महेश देवकते यांची सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात सर्वाधिक विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा, वंजारी, हटकर अशा प्रवर्गातील अनेक समाजाच्या तांडा व वस्तीमध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे व सदर सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, गटारे, संत रामराव महाराज सामाजिक सभागृह (समाजमंदिर) गावांतर्गत नाली, सौर उर्जेवर आधारित हायमास्ट, पेव्हर ब्लाॅक बसविणे, शौचालये, वाचनालये व मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची कामे होणे गरजेचे आहे.

वि.जा.भ.ज. समाजातील नागरिकांना स्थिर जीवन जगता यावे व त्यांच्या तांड्याना/वस्तींना मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून कामे मंजूर व्हावीत यासाठी जिल्हास्तरीय अमंलबाजवणी समितीने मंजूर केलेल्या आराखड्यातील जिवती तालुक्यातील विविध कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करुन, निधी वितरीत करण्याची मागणी जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंञी तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये