ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एस.सि./एस.टी.आरक्षणाचे वर्गीकरण, क्रिमिलेयरची अट

बल्लारपूर विधानसभा उमेदवारांची भूमिका ; खुली चर्चा कार्यक्रम संपन्न...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

दि.7.11.2024 ला बुद्ध पौर्णिमा समारोह समिती द्वारे खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले. एस सी/एस टी.आरक्षण चे वर्गीकरण आणि क्रिमिलेयर ची अट.या गंभीर विषयावर खुली चर्चा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बल्लारपूर विधान सभा क्षेत्रातील निवडणुकीत उभे असलेले सर्व उमेदवारांना “माझी भूमिका” हे मनोगत व्यक्त करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले.सर्व उमेदवारांनी स्वीकृती सुद्धा दिली.परंतु फक्त चार उमेदवार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले.

त्यात ऑल रिपब्लिकन पार्टीचे भारत थुलकर,वंचित बहुजन आघाडीचे सतिश मालेकर,अपक्ष असलेले डॉ. अभिलाषा गावतुरे,अपक्ष प्रकाश पाटील मारकवांर.यांची उपस्थिती होती. कास्ट कॅटेगिरी चे वर्गीकरण व क्रिमिलेयार ची अट या गंभीर विषयावर चर्चा सत्र घेण्यात आले.सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंच वर हा निर्णय देण्यात आला. हे निर्णय ठराविक वर्गात अनेक लोकांना मान्य नसून या निर्णयाचा काही ठिकाणी विरोध दर्शविला गेला.कारण ह्या निर्णयामुळे एस सी/एस टी.समुदायातील घटकांना परत एकदा आरक्षण पासून वंचित राहावे लागेल आणि पुन्हा एकदा जातीवाद निर्माण होईल.अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे राष्ट्रीय एकोपा आणि धर्मनिरपेक्ष समाज घडविण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या या दूरदृष्टी ला बाधा पोहचत आहे असे दिसून येते. समाजातील तळागाळतील आर्थिक,सामाजिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना उच्च स्थान आणि दर्जाची संधी प्राप्त व्हावी याकरिता संविधनामध्ये आरक्षणाची तरतूद केली आहे.परंतु सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे परत एकदा आरक्षित वर्ग विस्कळीत होण्याची संभावना दिसून येते .असे हजारो नागरिकांनी आपले मत स्पष्ट करताना दिसून येत.त्याच अनुषंगाने बुद्ध पौर्णिमा समारोह समिती.बल्लारपूर चे वतीने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन केले.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील फक्त चार उमेदवार यांनी या विषयाला समर्थन देऊन कोर्टाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आणि आश्वासन दिले की जर आमच्या पैकी कोणीही जर विधानसभेचे प्रतिनिधित्व करेल.

तर सर्व प्रथम आम्ही या गंभीर विषयाला तेथे मांडून न्याय मिळविण्याचा प्रयत्न करू. तसेच उपस्थित जनतेने सत्ता धारी पक्ष आणि विरोधी पक्षाचे बाकी उमेदवार उपस्थित झाले नाही.त्यावरून असे स्पष्ट होते की जे उपस्थित नाही. त्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात नाही .अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.ह्या कार्यक्रमाचे आयोजक बुद्ध पौर्णिमा समारोह समिती चे अध्यक्ष विश्वास देशभ्रतार,महासचिव आकाशकांत दुर्गे,कार्याध्यक्ष रितेश बोरकर,उपाध्यक्ष आनंद वाळके,कोषाध्यक्ष मुकेश अलोने,अतुल शेंडे,विकास जयकर,निळकंठ पाटील,विकास पेटकर,अनुज शेंडे,महेंद्र रामटेके,श्रीनिवास मासे,मंगल हस्ते,यांनी अगदी जाणीवपूर्वक अथक परिश्रमाने या चर्चा सत्रचे कार्यक्रम यशस्वी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये