ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चार लक्ष रूपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण

आमदार सुभाष धोटेंनी केले मृतक उरकुडे कुटूंबीयांचे सांत्वन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील मौजा वडगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या मनीषा अशोक उरकुडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच शासकीय मदतीच्या धनादेश कुटुंबीयांच्या सुपूर्त केला. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या आणि समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जेष्ठ नेते सुरेश मालेकर, उपसरपंच सुदर्शन डवरे, कोरपनाचे तहसीलदार प्रकाश वऱ्हाटकर, वडगाव चे मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी व्ही. जे.चिने, नांदा चे मंडळ अधिकारी उईके, कृषी अधिकारी ढोणे, ग्रा. प. सदस्य शामाकांत निखाडे, कैलास मेश्राम, संगीता मडावी, ग्रामसेवक कु. सारिका धात्रक, कृषी सहाय्यक तिडके, अशोक आस्कर, भोंगळे सर, रोशन आस्वले, भास्कर तुरणकर, दिगांबर लांजेकर, गुलाब जिवतोडे, शंकर उरकुडे, राहुल गाढवे, अशोक उरकुडे, वासुदेव उरकुडे यासह स्थानिक गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये