ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्लीपुर पोलीसांनी प्रोरेड करुन 86 हजारावर देशी दारुचा साठा जप्त

अज्ञात आरोपी पसार... 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक रोजी 9/9/2026 रोजी अल्लीपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संगीता हेलोंडे यांना गुप्तदाराकडून माहिती मिळाली की आलमडोह ते अल्लीपुर मार्गावर दुचाकी वाहाने देशी दारुची विक्री करिता दारुसाठा घेऊन येत आहे अशी माहिती मिळताच अल्लीपुर पोलीस निरिक्षक संगीता हेलोंडे व पोलीस कर्मचारी कांचन नव्हते विनोद येवले अजय रिठे मनोज नप्ते यांनी सापळा रचून आरोपीवर कार्यवाही करण्याकरीता गेले असताना आरोपीला माहिती मिळताच आरोपींने दुचाकी वाहन नंबर एम. एच.32- बी. ऐ. 3707 नंबर ची दुचाकी वाहन आणि देशी दारुचा 86,200/- रुपयांचा मुद्देमाल सोडून पसार झाला होता.

अज्ञात आरोपीवर पोलीस स्टेशन अल्लीपुर येथे अपराध क्रमांक 428/26 कलम 65(अ) (ई) 77(अ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे हि कार्यवाही पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा वंदना कारखेले उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली संगीता हेलोंडे पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन अल्लीपुर कांचन नव्हते विनोद येवले अजय रिठे मनोज नप्ते यांनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये