Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय येथे मॅराथॉन स्पर्धा संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे सहशालेय उपक्रमांतर्गत दिनांक 7 डिसेंबर 2024 शनिवारला इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुले व मुलींची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन मा. डॉ. अनिलराव चिताडे, प्राचार्य राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपूर,अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संचालक गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर तसेच प्रमुख पाहुणे धनंजयजी गोरे, सचिव विठ्ठलराव थिपे उपाध्यक्ष, रामचंद्रजी सोनपितरे,संचालक, गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर,मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .या स्पर्धेत 150 मुली व 160 मुलांनी सहभाग घेतला .स्पर्धेतील विजेते गट 5 ते 7 मुली प्रथम प्रांजली बालाजी मामिडवार,द्वितीय माही विवेकानंद विश्वास,तृतीय अहिल्या राजेंद्र सुरनर,5 ते 7 गट मुले प्रथम जिग्नेश प्रफुल थेरे,द्वितीय रमेश कालूराम गेहलोत, तृतीय आराव गणपत बोढाले, 8 ते 10 गट मुली प्रथम संस्कृती नितीन परसुटकर,व्दितीय दीपिका गोहकर, द्वितीय जुही वासुदेव उरकुडे,तृतीय हर्षदा खरवडे, 8 ते 10 गट मुले प्रथम देवांश प्रवीण गोरे,द्वितीय पियुष विजय गुरनूले,तृतीय सचिन उद्धव चव्हाण यांना प्रमुख पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

स्पर्धा क्रीडाविभागाचे प्रमुख संजय झाडे, अमोल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,पोलीस विभाग गडचांदूर तसेच आरोग्य विभाग गडचांदूर चे विशेष सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये