ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढोलीत दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांचा रस्ता रोको

दारू दुकान बंद झाल्याशिवाय माघार नाही_गावकऱ्यांची भूमिका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील वढोली या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाच्या विरोधात शुक्रवारी (दि. १९ जून) रोजी गोंडपिपरी_ मूल मार्गावर वढोली येथे दारू दुकानासमोर चार वाजता ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. दुपारी चारच्या सुमारास दारू दुकान सुरू झाल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. “जोपर्यंत दारू दुकान बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

वढोली गावात गेल्या सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदी आहे. सन १९९१ मध्ये ग्रामस्थांनी एकजुटीने संघर्ष करून शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यास भाग पाडले होते. यावर्षीही ग्रामपंचायतीने गावातील दारूबंदीचा ठराव मंजूर करून उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकारी यांना पाठविला होता. तरीही दारू दुकान सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे. महिलांच्या सुरक्षिततेसह सामाजिक शांतता आणि गावाची सांस्कृतिक परंपरा धोक्यात येईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावकऱ्यांच्या भावना आणि ग्रामसभेचा ठराव विचारात न घेता दारू दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

बातमी लिहेपर्यंत तब्बल रस्ता रोको आंदोलन सुरूच होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले,पोलिस उपनिरीक्षक मंगेश कराडे, तहसीलदार शुभम बहाकर, ठाणेदार हेमंत पवार यांच्यासह अनेक अधिकारी घटस्थळी परिस्थिती हाताळत होते.

“वढोली हे व्यसनमुक्त गाव म्हणून ओळखले जाते.गावकऱ्यांची इच्छा नसताना दारू दुकान सुरू करणे चुकीचे आहे.गावातील युवकांचे भविष्य वाचविण्यासाठी हे दुकान तात्काळ बंद करावे.यापूर्वी गावकऱ्यांनी देशी दारूचे सरकार मान्य दुकान बंद पाडले.नव्याने सुरू झालेले दुकान सुधा आम्ही बंद पाडू

_ *सुरज माडूरवार (सामाजिक कार्यकर्ते, वढोली)*

“ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला होता.संपूर्ण गावाचा दारू दुकानाला विरोध असून कोणत्याही परिस्थितीत ते सुरू होऊ देणार नाही.गावात दारू बंदी आहे.दुकान हटेपर्यंत माघार नाही.

_ *राजेश कवठे (प्रकाशक सरपंच, ग्रामपंचायत वढोली)*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये