ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कॉलर्स सर्च अकॅडेमी अँड ज्यू कॉलेज,कोरपना येथे स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा : आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्कॉलर्स सर्च अकॅडेमी आणि ज्यूनियर कॉलेज,कोरपना येथे स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रतिमापूजन झाले व नंतर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत नामांकित वसतिगृहातिल निवासी विद्यार्थिनी कुमारी दिपाली बंडू तोडासे या शिस्तप्रिय अष्टपैलू विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर्च फाऊंडेशन चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष मा. इंजि. दिलीप झाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय ठावरी सर माजी प्राचार्य वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना, श्री उत्तमरावजी मोहितकर सचिव संभाजी बहुउद्देशीय संस्था राजुरा, श्री कूचनकर सर, श्री अनिभाऊ रेगुंडावार साहेब, श्री राहुल उलमाले सर प्राचार्य ,स्कॉलर सर्च अकॅडेमी व ज्यू कॉलेज कोरपणा, तसेच सर्व शिक्षक वृंद, प्राध्यापक,विद्यार्थी, पालक परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.

      स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.देशभक्तिपर नृत्य सादर झाली, विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट भाषनानंतर संस्थेचे अध्यक्ष इंजि. दिलीप झाडे सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले तसेच जीवनात कशा प्रकारे शैक्षणिक प्रगती केली पाहिजेत , मार्ग कसे निवडायचे या बद्दल विशेष मार्गदर्शन केले. तसेच माजी प्राचार्य श्री संजय ठावरी सर यांनी विध्यार्थींचे शैक्षणिक प्रगती करीत असतांना त्यांच्या सुप्त गुणाना वाव प्राप्त करन्यास सांस्कृतिक कार्यक्रम गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले व परिस्थितीवर मात करून कसे ध्येय गाठता आले पाहिजेत याबदल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन वर्ग १२ वी ची विद्यार्थिनी कु श्रावणी अवथरे व कु समिधा जुमडे यांनी केले तर लुपेश्वरी पोडे मैडम यांनी आभार प्रदर्शन करून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीकरिता शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये