भद्रावती येथे भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा
रॅलीत 160 फूट लांबीचा तिरंगा ठरलानागरिकांचे आकर्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेने द्वारा ऑपरेशन सिंदूर राबवून आतंकवाद्यांचे पाकिस्तान मधील आंतकवादी कॅम्प नष्ट करून पाकिस्तानला धूळ चारित आपली ताकद उभ्या जगाला दाखवून दिली.
भारतीय सेनेच्या या शौर्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून ते हुतात्मा स्मारकापर्यंत मुख्य रस्त्यावरून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या रॅलीत 160 फूट लांबीचा तिरंगा शहरातील नागरिकांचे आकर्षण ठरला. रॅलीत सहभागी नागरिकांनी भारतीय सेनेचा जयजयकार करीत त्यांचे अभिनंदन करून आभार मानले. सदर रॅली हुतात्मा स्मारक येथे पोहोचल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली.
सदर रॅलीत आमदार करण देवतळे, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, प्रवीण सातपुते, पवन हुरकट, गोपाल गोस्वाळे, यांच्यासह शहरातील युवक, युवती, महिला तथा नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.