ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरात मुसळधार पाऊस

अनेक घरात शिरले पाणी

चांदा ब्लास्ट

         चंद्रपुरात गुरुवारी सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामूळे  शहरातील बहुतांश भाग जलमय झाला आहे. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत आहेत. रस्त्यांना तलाव स्वरूप निर्माण झाले आहे. शेकडो घरात पाणी शिरले आहे.

    पावसामुळे महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे. सखल भागात वस्ती असलेल्या नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तुकूम परिसरातील माउंट कार्मेल स्कुलच्या परिसरात काही घरात पावसाचे पाणी घुसले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये