ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या सोन्याच्या चेनची चोरी

गवराळा गणेश मंदिरातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना शहरातील गवराळा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिरात घडली. चोरीला गेलेल्या 15 ग्रॅमच्या सोन्याच्या चेनची किंमत 70 हजार रुपये एवढी आहे. सदर घटनेची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सदर मंदिरात भाविकांची गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

शहरातील सुमन दत्तात्रय हेपट ही महिला सुद्धा मंदिरात दर्शनासाठी आली होती.दर्शनासाठी लाईन मध्ये ती उभी असताना मागे असलेल्या एक दोन स्त्रिया त्यांना समोर जाण्यासाठी धक्का देत होत्या. या संशयित महिलांनीच ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. बाहेर निघाल्यानंतर आपली चेन चोरीला गेल्याचे त्यांना लक्षात आले.

त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते लगेच मंदिरात पोहोचले. त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही त्या संशयित महिला आढळून आल्या नाही.भद्रावती पोलीस या अज्ञात महिला चोरट्यांचा शोध घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये