ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली १० वर्ष कारावासाची शिक्षा

तसेच पाच हजार रुपये दंड

चांदा ब्लास्ट

पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी हद्दीतील बेलादाठी शेत शिवार पाच किमी उत्तर येथे घटना ता वेळी व ठिकाणी मृतकाने आरोपीच्या त्रासाला कंटाळून दोन्ही मुलांना घेऊन शेतात जातो म्हणून घरून निघून जाऊन मालडोंगरी शिवारातील विहिरीत दोन्ही मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली.

फिर्यादीच्या मुलीचे लग्न आरोपी सोबत सन २००८ मध्ये झाले. लग्नानंतर आरोपी काही दिवस चांगला राहिला. त्यानंतर त्याला दारू पिण्याची सवय लागल्याने तो मृतकाकडे पैशाची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास झगडा भांडण करून चारित्र्यावर संशय घेत होता. पोलीस शहर ब्रह्मपुरी येथे अप क्रमांक 17/2022 कलम 498 ( अ ),306 भा. द. वी. चे गुन्ह्यात आरोपी नामे रवींद्र मुरलीधर पारधी वय 42 वर्ष राहणार मालाडोंगरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यास न्यायालयाचे सुनावणी दरम्यान माननीय भालचंद्र साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश 2 चंद्रपूर यांनी साक्षीदार तपासले व योग्य – पुरावाच्या आधारे दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी आरोपी नामे रवींद्र – मुरलीधर पारधी वय 42 वर्ष, राहणार मालडोंगरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यास कलम 498 ( अ ) भादवी. मध्ये ३ वर्ष शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा. कलम 306 भादवी. मध्ये १० वर्षे शिक्षा पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा कलम 235 (2) सीआरपीसी. नुसार ठोठावली.

सदर गुन्ह्याचा तपास हा श्री. मिलिंद शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी,सरकार तर्फे ऍडव्होकेट संदीप नागपुरे चंद्रपूर, आणि कोर्ट पैरवी म्हणून पोहवा. रामदास कोरे / 414, नापोअ. विजय ब्राह्मणे / 2119 पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी काम पाहिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये