जायंटस इंटरनॅशनल ने घेतली मरणोत्तर नेत्रदान कार्याची दखल
देऊळगाव राजा ग्रुपला केले आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
भारतात स्थापन झालेल्या व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्था म्हणजे जायंटस वेल्फेअर फाउंडेशन च्या अंतर्गत देऊळगाव राजा शहरांमध्ये गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे विविध सामाजिक धार्मिक आरोग्य विषयक व शैक्षणिक, पर्यावरण विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे दरवर्षी जायंटस वेलफेअर फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्या ज्या ग्रुपने जे जे उत्कृष्ट कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यथायोग्य सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत असते यावर्षी कोईमतुर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये देऊळगावराजा जायंटस परिवाराच्या वतीने शहरातील अनेकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले त्याची संपूर्ण सविस्तर माहिती इंटरनॅशनला पाठवल्यानंतर त्यांनी त्याची दखल घेत कोयमतुर येथिल अधिवेशनामध्ये या ग्रुपला सन्मानित केले तसेच याच कार्याबद्दल जायंटस वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन दोन ब च्या झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा या ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की दिनांक 18 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील टीएमओ हॉटेलमध्ये आयोजित जायंटस वेल्फेअर फाउंडेशन 2 ब च्या नवीन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभामध्ये ज्या ज्या ग्रुपने मागील वर्षी उत्कृष्ट कार्य केले व कायम स्वरुपी प्रोजेक्ट केले त्यांच्या कार्याची दखल व त्यांनी केलेल्या रिपोर्टिंगची दखल घेऊन त्यांचा व त्यांच्या ग्रुपचा यथोचीत सन्मान करण्यात आला यामध्ये देऊळगाव राजा जायंटस ग्रुपने 2023 मध्ये जवळपास 15 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतले या मरनोत्तर नेत्रदानामुळे यावर्षी जवळपास 30 अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी उपलब्ध झालेली आहे यापूर्वी या ग्रुपने जवळपास 220 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतलेले आहे यामध्ये त्यांना वेळोवेळी जालना येथील गणपती नेत्रालयाच्या चमूने सहकार्य केलेले आहे या प्रकल्पामध्ये जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा फेडरेशन डायरेक्टर सन्मती जैन फेडरेशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम धन्नावत व जुगल किशोर हरकुट हे नेहमी सक्रीय असतात त्यांनी केलेल्या कार्याचा औरंगाबाद येथे गौरव करण्यात आला व जायंटस वेल्फेअर फाउंडेशन चे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर संजय गुगळे सूर्यमालाताई मालानी फेडरेशनचे माजी अध्यक्ष जगन्नाथ साळुंखे सर, गुरुदत्त राजपूत, नवनिर्वाचित अध्यक्ष अमित दिनेश मलानी, सचिव पल्लवी मालानी यांच्या उपस्थितीत या ग्रुपला व या ग्रुपच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.