भद्रावतीत जागतीक योग दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील विवेकानंद महाविद्यालय व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात जागतीक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विवेकानंद महाविद्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विवेकानंद ज्ञानपीठचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान,प्रशीक्षक कानोपात्रा कवाडे,सरीता सातपुते, चंद्रकात श्रीरामे,आदी ऊपस्थीत होते.
यावेळी स्वान यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्व विषद केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता बांबोडे यांनी,संचालन जयवंत काकडे यांनी तर आभार गजानन खामनकर यांनी मानले.निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातही जागतीक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डा.एल.एस.लडके,रुपाला सावसाकडे,श्रृतीका चौके ऊपस्थीत होते.प्राचार्य लडके यांनी यावेळी योगाचे महत्व उपस्थितांना सांगीतले.
सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा.सचीन श्रीरामे यांनी केले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक तथा विद्यार्थी उपस्थीत होते.