Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली नगरपंचायत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर ५ कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे भुमिपूजन

विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांचा विशेष प्रयत्नांचे फलित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली नगरपंचायत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर विविध विकास कामांच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राकरीता असलेला विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकांप्रती असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत केलेला पाठपुरावा यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली. या कामांमध्ये आणखी भर पडत सावली नगरपंचायत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर ५ कोटी रुपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला.

भूमिपूजन सोहळा पार पडलेल्या विकास कामांमध्ये प्रभाग क्र. ०३ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुर सिमेंट कॉकीट नाली बांधकाम करणे प्र.मा.किंमत २० लक्ष रुपये ,प्रभाग क्र. १५ मध्ये सिमेंट कॉकीट रोड व नाली बांधकाम करणे प्र.मा.किंमत २५ लक्ष रुपये, प्रभाग क्र. ११ मध्ये सिमेंट कॉकीट नाली बांधकाम प्र.मा.किंमत २५ लक्ष रुपये , प्रभाग क्र. १२ मध्ये सिमेंट कॉकीट रोड व पाईप नालीचे बांधकाम करणे प्र.मा.किंमत २५ लक्ष रुपये, प्रभाग क. १४ मध्ये सिमेंट कॉकीट नाली बांधकाम करणे प्र.मा.किंमत २५ लक्ष रुपये, प्रभाग क्र. ०२ मध्ये अर्थसंकल्प अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विजस्तंभाचे भुमिपूजन व सौंदर्याकरण करणे,तसेच कन्नमवार पुतळ्याचे सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन आज पार पडले.१ कोटी रुपयांच्या निधीतून सदर विकासकाम पूर्ण होणार आहे.प्रभाग क्र. ०७ मध्ये अर्थसंकल्प अंतर्गत महर्षि वाल्मिकी यांच्या पुतळयाचे नुतनीकरण व सौंदर्याकरण करणे प्र.मा.किंमत २५ लक्ष रुपये एकूण ५ कोटी रुपयांचा विकास कामांचे भुमिपूजन राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला.

  भूमिपूजन सोहळ्या निमित्त गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.डॉ.नामदेवराव किरसान,मा.संदीप पाटील गड्डमवार माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर,मा.दिनेश पाटील चिटणुरवार माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर, मा.नितीन गोहने काँग्रेस तालुका अध्यक्ष सावली ,सौ.उषाताई भोयर महिला तालुका अध्यक्ष, मा.संदीप पुण्यपकार उपनगराध्यक्ष सावली, मा.पुरषोत्तम चुदरी तालुका अध्यक्ष सरपंच संघटना,मा.किशोर कारडे युवा तालुका अध्यक्ष सावली,मा.प्रितम गेडाम सभापती नगरपंचायत सावली,सौ.सिमा संतोषवार सभापती नगरपंचायत सावली,सौ.प्रियंका रामटेके सभापती नगरपंचायत सावली,मा.नितेश रस्से नगरसेवक,मा.गुणवंत सुरमवार नगरसेवक,सौ.साधनाताई वाढई नगरसेविका,सौ.अंजलीताई देवगडे नगरसेविका, सौ.ज्योतीताई गेडाम नगरसेविका,सौ.ज्योतीताई शिंदे नगरसेविका पदाधिकारी तसेच कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये