Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षणाधिकारी दौऱ्यात मुख्याध्यापक गायब

पाथरी शाळेचा प्रताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

पाथरी – सावली तालुक्यातील पाथरी नगरी इंग्रज कालीन मध्यवर्ती ठिकाण असून येथे परिसरातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा भागविन्यासाठी रोज ये – जा करतात या ठिकाणी अनेक शासकीय कार्यालय असून पाथरी नगरीला तालुक्याचा दर्जा मिळावा या करिता अनेक वर्षांपासून पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती संघर्ष करीत आहे. या ठिकाणी शिक्षणासाठी अमरदीप इंग्लिश मिडीयम स्कुल, संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय,तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ( जिल्हा परिषद उच्च प्राथमिक) व जिल्हा परिषद हायस्कुल शाळा आहेत, परिसरातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असून गत वर्षी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झालेला आहे व जिल्हा परिषद हायस्कुल शाळा ही पी एम श्री मध्ये आलेली आहे व या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत.

परंतु या दोन्ही शाळेतील मुख्याध्यापक यांचा कार्यकाळ बघता शाळेतील वातावरण खराब होत असल्याचे चित्र आहे त्या मूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच आज जिल्हा परिषद चंद्रपूर चे शिक्षणाधिकारी यांनी शाळा पाहणी संदर्भात दौरा केला असता जिल्हा परिषद हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री चौधरी हे अनुपस्थित होते व शिक्षणाधिकारी यांनी दस्तावेज तपासणी बाबतीत दस्तावेज मागितले असता या ठिकाणी आढळून आलेले नाही, जिल्हा परिषद हायस्कुल शाळा पी एम श्री मध्ये आलेली असून शाळेच्या विकासासाठी या ठिकाणी लाखो ने निधी येत असून मुख्याध्यापक यांच्या अनुपस्थिती मूळे यात काही घोळ तर नाही ना अशी शन्का निर्माण होत आहे.

जर मा. शिक्षणाधिकारी यांचा नियोजित दौरा असताना जबाबदार मुख्याध्यापक हेच गायब असतील तर शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील कुठली पाहणी करावी अशी चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये