Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

दोन दुचाकींच्या धडकेत एक युवक ठार

दुसरा गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रह्मपुरी : दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील स्वागत मंगल कार्यालयाजवळ घडली.

शुभम मनोहर बनकर (२७) रा. पिंपळगाव (भोसले) असे मृतकाचे नाव आहे. शुभम मनोहर बनकर हा शनिवारी सायंकाळी आपल्या मोटारसायकलने (एमएच ३४ बीवाय ३९१३) वेगात ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील स्वागत मंगल कार्यालयासमोरून जात होता. दरम्यान, विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ३६ एडी २३९७)समोरासमोर धडक बसली. धडक एवढी भिषण होती की दोन्ही दुचाकावरील चालक हवेत दुर अंतरावर फेकल्या गेले

दुसऱ्या मोटारसायकलवरील युवक प्रणय आत्माराम उरकुडे (२१) रा. अन्हेर नवरगाव हा गंभीर जखमी झाला असून त्याला आस्था हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यात शुभम बनकर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये