ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनपा आयुक्त यांच्यावरती कारवाई करा – राजेश बेले

चांदा ब्लास्ट

 मल्लनिसारण केंद्र, पठाणपुरा येथे विश्वराज इनव्होरमेंट प्रा. लि. यांनी शासकीय जागेवर सोलर पॅनल ठेऊन केलेल्या बेकायदेशिर अतिक्रमाबाबत संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी तक्रार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री अशोक उईके व चंद्रपूर जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत येणा-या मल्लनिसारण शुध्दीकरण केंद्र, पठाणपुरा येथे विश्वराज इनव्होरमेंट प्रा. लि. या खाजगी कंपनीने शासकीय मालकीच्या जागेवर अवैध्यरित्या खाजगी मालमत्ता सोलर पॅनल ठेऊन अतिक्रमण केले आहे.

या सोबतच अशी माहिती प्राप्त झाली आहे की, चंदपूर शहर महानगरपालिका आयुक्त विपीन पालेवार यांनी संबंधीत कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिली आहे यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असुन ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिका-यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दोषी अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शासकीय जागेवरील अवैध्यरिता सोलर पॅनल त्वरीत हटवून ती जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालकीत पुन्हा आणण्यात यावी.

       भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नये म्हणुन संबंधीत अधिका-या वरती जबाबदारी निश्चित करण्यात यावी. ही तकार सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यात येत आहे. आपण या प्रकरणत त्वरीत लक्ष घालुन कारवाई कराल…

 अशी तक्रार राजेश वारलुजी बेले संस्थापक-अध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये