ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न

महाविद्यालयात प्रवेशीत १०० विद्यार्थ्यापैकी सर्वच विद्यार्थ्याचे मतदार यादीत नांव समाविष्ट

चांदा ब्लास्ट

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. ०२/०९/२०२३ रोजी महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी.के. पेटकर यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी जागृती अभियानाचे महत्व व मतदार नोंदणी विषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयात प्रवेशीत १०० विद्यार्थ्यापैकी सर्वच विद्यार्थ्याचे मतदार यादीत नांव समाविष्ट होते. अशाप्रकारे नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करुन नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. नवमतदार नोंदणी शिबिराचे प्रास्ताविक व संचालन डॉ. एस. एम. सातपुते नोडल अधिकारी यांनी केले.

सादर कार्यक्रमात डॉ. राजेश पत्तीवार, प्रा. विजय मालेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. संजय रंगारी, श्री. राजेद्र जुमडे, श्री. अमित अत्तेरकर, श्री नामदेव नन्नावरे, श्री. अंशूमन बोरीकर, श्री. मनिष यादव, राजु चामाटे, किशोर धनविजय, बालाजी जिवतोडे, अरुण पाटील तसेच बि.एड द्वितीय वर्ष विद्यार्थी नवमतदार नोंदणी शिबिरात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये