माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; ३८ वर्षांनंतर आले एकत्र
माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी येथील नेवासाबाई हितकारिणी विद्यालयातील १९८७ सालच्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ३८ वर्षानंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. माजी मुख्याध्यापक मराठे सर , राम दोनाडकर सर , गोडे सर, सुखदेवजी प्रधान सर, ऋषी जी राऊत सर, मिसार सर आणि ग्रंथपाल देवराव ठेंगरी आदींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थी यांनी शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. शिक्षक सुखदेव प्रधान सर यांनी सुखी जीवनासाठी वेळ काढून गेट-टुगेदर व्हायलाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.
तसेच व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांनी अडचणीचा सामना करत न डगमगता त्यावर मात करत समोर जावे असे आवाहन केले त्यानंतर इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन एजाज हक यांनी तर नियोजन परेश करंडे व प्रशांत गावतुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.