ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन!

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन विषय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

विद्यार्थ्यांना या आधुनिक युगात नानाविध क्षेत्रात  उत्तम करिअर करण्यासाठी मोकळ्या झालेल्या दालणांची इतंभूत माहिती व्हावी आणि त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्यासाठी उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विदर्भ महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि तहसिल कार्यालय, जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिवती तहसीलचे तहसिलदार अविनाश शंबटवाड यांनी, “विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे परिश्रमपूर्वक मार्गक्रमण करताना, आपले छंद जोपासत लक्षप्राप्ती करणे सहज-सोपे आहे” असे प्रतिपादन करून सबंधित विषयावर सविस्तर प्रकाश टाकत स्पर्धा परीक्षा आणि वर्तमानकाळात करिअर घडवण्यासाठी विविध क्षेत्रांत उपलब्ध असणाऱ्या अनेक संधी यावर साधकबाधक चर्चा केली.

तर या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या सदर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्या यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, “उज्वल भविष्याचा मजबूत पाया रचण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सध्याकालीन बाजारात उपलब्ध असणाऱ्या संधींचा वेध घेत, प्रचंड कष्ट उपसत आणि मनाशी पक्का निर्धार करून यशाला गवसणी घातली पाहिजे.”

सदर कार्यशाळेचे आयोजन, नियोजन आणि संयोजन महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे डॉ. श्रीकांत पानघाटे तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. महेन्द्र साबळे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी नायब तहसिलदार शिल, येनगे आणि महाविद्यालयाच्या समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यशाळेच्या समारोपाची धुरा प्रा. संजय मुंडे यांनी उत्तमरीत्या सांभाळली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये