ताज्या घडामोडी

जि. प. प्राथ. शाळा, खडकी येथे स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट  : प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील खडकी येथे जि. प. प्राथ शाळेत 76 वा स्वतंत्र दिना चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.. विविध उपक्रमासाठी परिचित असणारी ही शाळा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात अग्रेसर ठरली.. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारत माता यांची वेशभूषा केले ली चिमुकली, गावातील जेष्ठ मंडळी, माता भगिनी, तरुण मंडळी, आणि विद्यार्थी सर्वांचा सहभाग मोठा होता.. प्रभात फेरी,ध्वजरोहन,चिमुकल्या मुला मुलींची भाषणे, देशभक्ती पर गीत.. श्री तुमराम सर यांनी आपल्याभाषणात स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षात स्वातंत्र् सैनिकांच्या त्याग आणि बलिदान यांची आठवण करून दिली.. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिभाऊ किन्नाके अध्यक्ष शा. व्य. स., प्रमुख पाहुणे सौ निर्मला किन्नाके, श्री दौलत मेश्राम, प्रभाकर वेरकाडे, अनुसया किन्नाके, सोनू तोडसे, अर्चना पेंदोर, संकुटराव गेडाम पोलीस पाटील,गावातील जेष्ठ नागरिक, पालक, मोलाचे सहकार्य बापूजी किन्नाके, लक्ष्मण उरवते यांनी केले. यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला.. कार्यक्रमाचे संचालन श्री समरीतकर सर यांनी केले..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये